कोणत्याही समाजाच्या विकासाचा आणि परिवर्तनाचा एक महत्वाचा मार्ग शिक्षणातून जातो. शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन आदिवासी समाजातील अनेक शिक्षित बांधव एकत्र येऊन प्रामुख्याने आदिवासी परिसरात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, आरोग्य इ. क्षेत्रात जागृती करण्यासाठी, आदिवासी समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि आदिवासी युवकांना मार्गदर्शन करत त्यांना योग्य दिशा दाखविण्यासाठी मा.यशवंत पवार यांच्या मार्गर्शनाखाली 'आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान' ही संस्था 2019 मध्ये स्थापन केली. संस्थेची अधिकृतपणे धर्मादाय कार्यालयात नोंदणी केलेली आहे. संस्थेला 12A आणि 80G ची मान्यता मिळाली आहे. प्रतिष्ठानने केवळ दोन वर्षात विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करून विद्यार्थ्यांना व युवकांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांना योग्य दिशा दाखवत आहे.
नवोदय परीक्षेस बसलेल्या छोट्या बालकांना मार्गदर्शन करण्यासाठी दि. 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2019 या कालावधीत नवापाडाच्या शासकीय आश्रमशाळेत निवासी कार्यशाळेचे आयोजन. 115 विद्यार्थी सहभागी.
Read More
पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या आदिवासी भागातील युवकांसाठी दि. 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2019 याच कालावधीत नवापाडा आश्रमशाळेत निवासी कार्यशाळेचे आयोजन. 55 युवकांचा सहभाग.
Read More
1 डिसेंबर 2019 रोजी कै.हरीभाऊ चौरे आदिवासी आश्रमशाळा पिंपळनेर येथे शिबिराचे आयोजन. 50 युवकांचा सहभाग. आणि विद्यार्थ्यांना अभ्यास व्यवस्था - विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेऊन मेरिटमध्ये आलेल्या आठ युवकांची महिन्याभरासाठी अभ्यासाची सुविधा करण्यासाठी नंदुरबारला लायब्री, निवास आणि भोजनाची व्यवस्था.
Read Moreआदिवासी कला व क्रीडा महोत्सव 2020
वैचारिक प्रबोधन आणि विविध कला स्पर्धा' (Online)
सामुहिक आदिम लगीन सोहळा २०२४
अभ्यास दौरा, तेजगड गुजरात